प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री तथा दिव्यांगांचे कैवारी बच्चू कडू यांचा गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजीचा दौरा कार्यक्रम भंडारा जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यभरात शेतकरी शेतमजूर हक्कयात्रा काढली आहे. यात्रेला दिनांक 30 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात करण्यात आले. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार बांधवांच्या प्रश्नांना शासन दरबारी न्याय मिळवून देणे हा यात्रेच्या उद्देश आहे.