गणेशोत्सव संपत आला तरीही नाशिक शहरात मुख्य रस्त्यांसह सर्वच ठिकाणी मोठमोठी खड्डे पडली आहे.त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.मुख्य रस्त्यावर काँक्रिटीकरण झालेले नाही; त्या भागात खड्ड्यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे.दोन दिवसांनी श्री गणेशाचे विसर्जन होणार असल्याने ठिकठिकाणी भव्य मिरवणुका काढल्या जातात.मनपाने नेमून दिलेल्या ठेकेदाराचा प्रताप कॅमेरात कैद झाला आहे भर पावसात खड्ड्यात डांबर टाकून तात्पुरते डागडुगी केली जात आहे.