काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने (५ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता प्रकल्पाचे आठही दरवाजे ६० सें.मी. उंचीने उघडून ३८४.४६ क्यूमेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.तसेच दगडपारवा प्रकल्पातही १० सें.मी. उंचीचा एक दरवाजा उघडून ४.१४ घ.मी./से. इतका विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ही माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दुपारी ४ वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे