– श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या भव्य आगमन मिरवणुकीला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. ढोल-ताशा पथकाच्या दणदणीत तालावर आणि झांज पथकाच्या गजरात वातावरण गणेशमय झाले. सुरेख वादनाने नागरिकांची मने जिंकली. यावेळी पथकाने ऐतिहासिक आणि क्रांतिकारी प्रसंगांचे देखावे सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोट छाटलेली घटना तसेच क्रांतीवीर चाफेकर बंधूंनी रँडचा वध केलेला प्रसंग याचे नेत्रदी