पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर या कालावधीत महसूल विभागामार्फत भंडारा तालुक्यात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी तालुक्यात सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील पानंद रस्ते, शिवरस्ते, शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन, तसेच अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अतिक्रमणधारकांना योग्य त्या पद्धतीने पट्टे देऊन घरकुल योजनेंतर्गत स्वतःचे घर मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रमही राबविण्यात.