कुस्ती ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे, गावोगावच्या आखाड्यांमधून घाम गाळत घडणारे पैलवान हेच उद्याचे महाराष्ट्र केसरी, भारत केसरी होतात. पण गेल्या काही काळापासून या क्षेत्रावर गैरव्यवहारांचे सावट आले आहे. कुस्ति मलविद्या पुणे जिल्हा व सर्व पालक एकत्र येऊन या अन्यायाविरोधात ठाम उभे राहिले आहेत. खोटे वय दाखवून, बनावट कागदपत्रं तयार करून आणि पासपोर्टमध्ये फेरफार करून खरी मेहनत घेणाऱ्या मुलांची स्वप्नं चिरडली जात आहेत, हे प