लातूर -उदगीर ग्रामीण परिसरातील एटीएम मशीन गॅस कटरने फोडून रोख रक्कम चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. या कारवाईत चार आरोपींना वाहन व उपकरणांसह ताब्यात घेतले असून, एकूण १२ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.