उंबरखेड या गावात सुनील युवराज दळवी भिल वय ३५ हा तरुण आपल्या घरी होता. त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय मेहुणबारे येथे आणण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.