पिंपरी- चिंचवडमध्ये पुन्हा एकदा कुत्र्यांची दहशत पाहायला मिळाली. चिखली मोरे वस्ती येथे पहाटे पाचच्या सुमारास कामावर जाणाऱ्या तरुणावर सात कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला चढवला, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे. यात तरुण जखमी झाला आहे, महानगरपालिकेने तात्काळ या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.