आज गुरुवार 11 सप्टेंबर रोजी क्रांतीचौक पोलिसांनी माहिती दिली की, 10 सप्टेंबरला दुपारी चार वाजता महिला फिर्यादी मीना मारुती कोथंबीर वय 48 वर्ष राहणार बिडकीन ता. पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, 10 सप्टेंबरला दुपारी एक वाजता मध्यवर्ती बस स्थानकातून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरी करून नेले आहे, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल पटेल हे पुढील तपास करीत आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली.