मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या जेवणाच्या अनेक समस्या उभ्या ठाकल्या होत्या. मात्र या समस्येवर उपाय म्हणून बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावातून मदतीचा हात पुढे आला आहे. गावोगावी महिलांनी, शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी स्वतःच्या हाताने भाकऱ्या तयार केल्या. या लाखोंच्या संख्येतील भाकऱ्या आज मुंबईकडे रवाना करण्यात आल्या आहेत.