सेनगांव तालुक्यातील दाताडा बुद्रुक या ठिकाणी शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेला पोळा पारंपारिक पद्धती नुसार साजरा करण्यात आला. मात्र या दाताडा बुद्रुक या ठिकाणी शेतकऱ्यांनी बैल जोडीवर रेखाटलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे नाव व चलो मुंबई या आशयाचा मजकूर आकर्षण ठरले आहे. दाताडा बुद्रुक या ठिकाणी शेतकऱ्यांकडून आपल्या सर्जा-राजाची सजवुन घरोघरी नैवेद्य दाखवून महापूजा करण्यात आली. अतिशय गुन्या गोविंदाने पोळ्याचा हा सण पारंपरिक पद्धती नुसार साजरा करण्यात आला.