माजलगाव धरणाचे सहा दरवाजे उघडले, नागरिकांना प्रशासनाचा इशारा ,बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. वाढत्या पाणीपातळीचा ताण लक्षात घेऊन धरण प्रशासनाने आज धरणाचे तब्बल सहा दरवाजे उघडले आहेत. यामुळे गोदावरी खोऱ्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वेगाने वाढू शकतो, त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी दक्षता