नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दोन आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन मुसळधार पावसाने शेतात तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सोयाबीन कापूस व तूर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना माजी जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाप्रमुख मनोज कडू बाळासाहेब राणे यांचे नेतृत्वात आज २५ ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी अडीच वाजता नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात धडक देऊन पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली..