लातूर -लातूरातील आदम नगर भागात लातूरत काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य भिजले आहे. दरम्यान मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने याची दखल घेत आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नागरिकाच्या घरात साचलेले पाणी व रस्त्यावरून घरात शिरणारे पाणी बंद केलेले असून पाण्याचा निचरा करून देण्यात आला असल्याचे मनपाच्या वतीने आज दुपारी तीन वाजता सांगितले.