वसंत देसाई स्टेडियमवर अकोला पोलीस मिशन उडान व युवा विचारपीठ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने “नशा विरुद्ध रंगाची लढाई” दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली. जिल्ह्यातील शाळा-विद्यालयातील १५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रंगभरण आणि चित्रकलेत सहभाग घेऊन व्यसनमुक्त भारताचा संदेश दिला. छोट्या मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी “नशा सोडा जीवन जिंका”, “आरोग्यदायी भारत” यांसारखे संदेश रंगरेषांमध्ये मांडले. विजेत्यांना प्रमाणपत्र व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. पोलीस अध