उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संदीप कुमार अपार यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी वैशालीताई मुळे,तहसीलदार शिल्पा बोबडे,शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव,नगरपरिषद अभियंता संकेत तोंनकुलवार,वि.वी.कंपनीचे कार्यकारी अभियंता अभय कदम,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रियंका पटरीया समवेत जुनी वस्ती परिसरात आगामी गणपती उत्सव व ईद-ए-मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवार २५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मिरवणूक रस्ता मार्गाची पाहणी करून संबंधितांना सूचना,मार्गदर्शन केले.