तरडगाव येथील सरकारी दवाखान्याच्या समोरील पुलावर रविवार दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात नांदल गावातील नवनाथ जगन्नाथ कोळेकर (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर जखमी अवस्थेत असलेल्या कोळेकर यांना वेळेत मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत लोणंद पोलीस ठाण्यातून मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार नवनाथ कोळेकर हे आपल्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलवरून कामावरून घरी जात असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली.