पाटण गावात एकाला मारहाण, रोशन संतोष परदेशी वय 22 वर्ष राहणार पाटण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी माझ्या आईला माझे वडील हे मारत असताना मी माझ्या आईला वाचवण्यासाठी गेलो असता माझे वडील यांनी वाईट वाईट शिवीगाळ करत माझ्या पोटावर चाकुने वार करत मला गंभीर दुखापत केले व तुला पोटात चाकू मारून मारून टाकेल अशी देखील धमकी दिली. यावरून एका विरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.