वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शहरातील जिंतूर रोडवरील शासकीय डी.एड. कॉलेज मैदानाजवळ आणि गंगाखेड रोडवरील एसटी वर्कशॉप परिसरात बस स्थानक उभारल्यास मुख्य बसस्थानकावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. शहरातील वाहतूक मार्ग सुरळीत होतील आणि अपघाताचे प्रमाणही घटेल,शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही मागणी तात्काळ मान्य करावी अशी मागणी माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांकडे आज गुरुवार 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता केली आहे.