मंदीरातून घरी जात असलेल्या एका वृध्द महिलेच्या गळ्यातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगलपोत अज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीवर येवून जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास टिळक नगरात घडली आहे. याबाबत बुधवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.