हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या उपस्थितीत आज सेनगांव पंचायत समिती कार्यालयामध्ये ग्रामविकास व पंचायतराज विभागाअंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी उपस्थित राहून अधिकारी व पदाधिकारी यांना गाव पातळीवरील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले. पंचायत समिती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत अधिकारी वर्ग व तालुक्यातील सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी व ना