कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख या गावात मंगळवार, दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी मोठा आंदोलनाचा स्वर उमटला.गावातील जिल्हा प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या चार शिक्षकांच्या बदल्या रद्द कराव्यात, अशी पालकांची ठाम मागणी असून यासाठी सकाळी साडेनऊ वाजता शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय पालकांनी प्रत्यक्षात आणला.या शाळेत शिक्षक संतोष रहाटळ, संगीता उनवणे, वैशाली कोकाटे आणि शितल दुस कार्यरत होते. त्यांची इतरत्र बदली झाल्याचे समजताच पालक व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली.