पाटोदा तालुक्यातील मांजरा नदीने सततच्या पावसामुळे धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली असून नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात व परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने मांजरा नदीतील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी अनावश्यकपणे नदी परिसरात जाऊ नये, तसेच शेतकरी व जनावरांसह नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलावे