महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज दुपारी १२ वाजता अंजनगाव येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.या वेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली. हे विधेयक सामान्य जनतेच्या हक्कांवर गदा आणणारे असून लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना विरोध करणारे असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.तहसीलदार यांना या संदर्भात निवेदन देवुन तात्काळ विधेयक रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.