नंदुरबार शहरातील प्रसिद्ध मानाचा व नवसाला पावणारा श्रीमंत बाबा गणपती यांच्या मूर्तीला रथावरच बनवायला सुरुवात करण्यात आली आहे. ही मूर्ती शेतातून काळी माती आणून कापसाच्या मदतीने सर्व मंडळातील सदस्य आपल्या हाताने आकार देऊन बनवीत असतात. दिवसभरातील कामे आटपून सायंकाळ पासून ते रात्रीपर्यंत मूर्ती कामास मदत करीत असतात.