कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुराचे पाणी ओसरू लागले असले तरी शिरोळ तालुक्यातील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या वाढलेल्या पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनही पाणीपातळीत वाढ होत आहे.त्यामुळे प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू केले आहे.वरच्या भागातून विसर्ग कमी झाला असला तरी कृष्णा-पंचगंगा नद्यांचा संगम शिरोळ तालुक्यात असल्याने पाण्याचा मोठा साठा येथेच जमा होत आहे.