नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. गंगापूर धरणातून ३२०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्याची स्थिती : गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे पाण्यात बुडाली आहेत. दुतोंड्या मारुती मंदिर परिसरात कंबरभर पाणी साचले आहे.