पारोळा-- तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरणावरील पंधरापैकी 14 दरवाजे उघडून 12642 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे बोरी धरण अगोदरच शंभर टक्के भरलेले असून काल परवा झालेल्या पावसामुळे धरणात आवक वाढल्याने एकूण 15 पैकी 14 मोरया 0.30 सेंटीमीटरने आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता सोडण्यात आले आहेत. याबाबत आमदार अमोल पाटील तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे व पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा दिला