30 ऑगस्ट ला रात्री नऊ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पोलीस ठाणे वाडी हद्दीतील अवतार ढाबा येथे छापा मार कार्यवाही करून कुख्यात आरोपी अल्तमश मोहम्मद युसुफ मंसूरी याला अटक केली. आरोपीच्या दुचाकीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक लोखंडी धारदार चाकू जप्त करण्यात आला. आरोपीकडून विना नंबरची दुचाकी व चाकू असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.