लोणी काळभोर येथे ग्रामपंचायत हद्दीत रामाकृषी रसायन ही कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत उगवलेले आहे तर कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. या ठिकाणी दोन परप्रांतीय महिला शिरल्या. त्यांनी माठाच्या देठाच्या भाजीसारख्या दिसणाऱ्या भाज्या गोळा केल्या. देठाची भाजी असल्याचे भासविण्यासाठी त्यांनी भाजीची छाटणी केली. व पाला कचऱ्यात फेकून दिला आणि देठ गोळा करून विक्रीसाठी घेऊन गेल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.