गणपती विसर्जनासाठी अरुणावती नदीपात्रात गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत्यूंजय राजेश राठोड (वय २३, रा. वरोली सेवादास नगर, ता. मानोरा) असे मृतकाचे नाव आहे. दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास गणपती विसर्जनासाठी गेलेल्या मृत्यूंजय याला पाण्याच्या प्रवाहाने वाहून नेले. मानोरा प्रशासनाने शोध घेतला मात्र तो सापडला नाही. यानंतर पोलिसांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध पथकाच्या मदतीने शोध सुरू ठेवला. दि. ८ सप्टेंबर रोजी अरुणावती नदीपात्रात आढळून आला.