लातूर -लातूर शहरातील ट्युशन एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूत मिल रोडवरील सिद्धार्थ चौक परिसरात काल सायंकाळी मोठा गोंधळ उडाला. वाहनांचा आवाज, आरडाओरडा, हाणामारी यामुळे काही काळ परिसर दहशतीच्या छायेत आला होता.घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून एका २१ वर्षीय विद्यार्थ्यास काठीने जबर मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर परिसरातील व्यापारी, पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात घाबरले होते. अचानक झालेल्या या गोंधळामुळे नेमके काय घडले हे कुणालाच काही काळ समजले नाही.