मेळघाटात वाघ व बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेत सतत वाढ होत आहे,आठवडाभरापूर्वी कुलगणा खुर्द येथील एका युवकाचा वाघाने बळी घेतल्यानंतर आज ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता चिखलदरा तालुक्यातील तारूबांदा निवासी प्रेम मुन्ना कासदेकर या वन मजुरावर रामदेव बाबा कॅम्प खोंगडा येथे वाघाने हल्ला करून त्याला ठार केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली झाला या परिसरातील ही चौथी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.