काही काही कुटुंबांमध्ये जेष्ठ नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नसेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या वतीने जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन मिळेल. आपण केव्हाही न घाबरता या प्राधिकरणाच्या कार्यालयात या असे आव्हान जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी चे सचिव आर. आर .पाटील यांनी केले.