अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्री क्षेत्र जाळीचा देव शाखा खामगाव तालुका यांच्या वतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या ८०३व्या अवतार दिनानिमीत्त आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान पॉलीटेक्नीक ग्राउंड येथुन दुचाकी रॅलीला सुरूवात करण्यात आली. खामगाव शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत खामगाव तालुक्यातील मांडका येथील श्री दत्त मंदिर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यानंतर स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.