ठाणे शहराच्या मखमली तलाव परिसरात असलेल्या ब्रिजच्या बाजूला एका बाबा थँक्स नावाच्या दुकानांमध्ये आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली होती. माहिती मिळताच नौपाडा पोलीस अधिकारी,आपत्ती व्यवस्थापन कक्ष,अग्निशमन इंजिन घटनास्थळी दाखल झाले आणि वीस मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेमध्ये आग लागताच सर्वजण बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु दुकानांमधील इलेक्ट्रिक बॉक्स,वायरिंग जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.