औसा -औसा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच तावरजा व मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन संकट गडद झाले आहे.याच अनुषंगाने दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता औसा तालुक्याचे तहसीलदार श्री. घनश्याम अडसूळ यांनी मौजे शिवनी बु. व भुसनी या गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तहसीलदार अडसूळ यांच्यासह महसूल विभागाचे पथकही या वेळी उपस्थित होते.