हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस् हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रिडा दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रिडा परिषद व क्रिडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध क्रिडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मॅराथॉन दौड चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅराथॉन दौड मध्ये नागरिक, क्रिडा क्षेत्रातील क्रिडा प्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.