आज दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 1 च्या वेळेत धर्माबाद शहरातील ईद ए मिलाद उन नबी हा सण मुख्य रस्त्याने मोहम्मद पैगंबर यांच्या नावाचा जयघोष करत नारे लावत धार्मिक पद्धतीने तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली असून यावेळी पोलीस स्टेशन धर्माबाद तर्फे मुस्लिम बांधवाना गुलाबपुष्प व लहान मुलासाठी चॉकलेट वाटप करत पाहुणचार केले होते, तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू यासाठी चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.