बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील निर्गुणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहत जाणाऱ्या वाडेगाव येथील ३५ वर्षीय युवकाची नदीकाठच्या युवकांनी जीवावर उदार होऊन थरारक सुटका केल्याची घटना शुक्रवार दि. ८ ऑगस्ट दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली असून त्यावेळी बघ्यांची एकचं गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. बजरंग ढोरे असं या ३५ वर्षीय शेत मजुराचे नावं असून ते दुपारी शेतात काम करून घरी येत होते. पातूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे वाडेगावातील निर्गुणा नदीला पूर आला होता.