रविवार 7 सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री होणारे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले रविवार 7 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. रात्री 11 ते 12.23 दरम्यान संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीचे दर्शन होईल. खग्रास स्थितीमध्ये पौर्णिमेचे संपूर्ण चंद्रबिंब लालसर, तपकिरी रंगाचे दिसेल. रात्री 12.23 वाजता चंद्रग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल.