भंडारा जिल्ह्यातील कोका (Koka) येथे पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कोका येथे उभारण्यात आलेल्या भव्य टूरिस्ट गेटचे (Tourist Gate) लोकार्पण आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते दिनांक 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडले. या गेटमुळे आता कोका परिसरातील पर्यटनाला एक नवी ओळख आणि नवी दिशा मिळणार आहे. तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकट चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.