खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ-पणदूर येथे मालवाहू ट्रक थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळला. ही घटना आज गुरुवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता घडली. सुदैवाने ट्रक दुभाजकाच्या पलीकडे न गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे.