लातूर :-महिलांना गर्दीच्या ठिकाणी गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, पर्समधील रोख रक्कम चोरणाऱ्या एका महिला चोरट्याला गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून दीड तोळे सोन्यासह ५ हजार ७०० रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. अशी माहिती आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याची दरम्यान गांधी चौक पोलिसांनी दिली आहे.