आज बुधवार 10 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आज क्रांती चौकात मोठे आंदोलन करण्यात आले आहे, जन सुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने मोठे धरणे आंदोलन क्रांती चौकात आज रोजी करण्यात आले आहे, यावेळी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.