सावंतवाडी रेल्वे स्थानकात दिव्यांग प्रवाशांना मोठी कसरत करत रेल्वे गाठावी लागत होती. त्यामुळे त्यांची होणारी फरफट लक्षात घेऊन याठिकाणी दोन व्हिलचेअर उबाठातर्फे रेल्वेस्थानकास प्रदान करण्यात आल्या असल्याची माहिती उबाठाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली. यावेळी उबाठाचे कार्यकर्ते आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.