नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवरील खंडाळा शिवारात उभ्या असलेल्या कंटेनराला दुचाकीस्वाराने जबर धडक दिली या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर मागे बसुन असलेला व्यक्त गंभीर जखमी झाला. प्राप्त माहितीनुसार राळेगाव येथील मृत्यक दुचाकीस्वार ओम साधुजी डोळसकर वय २१ वर्ष व जखमी मनोहर पंजाब मडावी वय ४५ वर्षे दुचाकी क्रमांक MH32AW4442 ने नागपूर ते जाम मार्ग भरधाव वेगाने जात असताना दुचाकीस्वाराचे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने दुचाकी खंडाळा शिवारात उभ्या असले कंटेनराला धडक दिली.