माहेगाव देशमुख येथे गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी धडक कारवाई केली आहे. सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी ट्रॅक्टर पकडला. याबाबत आज ३० ऑगस्ट रोजी दुपारी १ वा. तालुका पोलिसांनी माहिती दिली आहे.माहेगाव शिवारात कुंदन मोरे नावाचा युवक लाल रंगाचा स्वराज 744 FE ट्रॅक्टर आणि लोखंडी केणीच्या सहाय्याने शासनाची कोणतीही परवानगी न घेता वाळू उपसा करत होता. माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला.