ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बीड शहरातील स्वागत मंगल कार्यालय, नगर रोड येथे ओबीसी बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीचे नेतृत्व ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले. या प्रसंगी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्यासह बीड जिल्ह्यातील अनेक ओबीसी पदाधिकारी व मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. बैठकीत बोलताना लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाला एकत्र येऊन आरक्षण टिकवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, समाजाच्या हक्काच्या प्रश्नावर कुणीही गदा आणू नये यासाठी सर्वांनी संघटित व्हाव